अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन ची मासिक सभा आणि जागतिक महिला दिन कार्यक्रम गुजराती कॉन्व्हेंट सभागृहात संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या उत्साहात संपन्न झाल याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व समाजसेवी डॉ आशा निकते उपस्थित होत्या
मंचावर संघटनेचे उपाध्यक्ष रामभाऊ बिरकड सचिव एकनाथराव उके सहसचिव मोरेश्वर आंबुलकर कोषाध्यक्ष विठ्ठल दांदळे कार्यकारणी सदस्या विमल गाडेकर प्रभा खरात ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य शांताराम बुटे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते
सर्वप्रथम मा जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि रमाबाई यांच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले
प्रमुख अतिथी डॉक्टर आशा निकते यांचा शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर संघटनेच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्तुत्ववान ज्येष्ठ महिला सभासदांचा जागतिक महिला दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये विमल गाडेकर प्रभा खरात सिंधू ताई शिंदे हिरुताई ठाकरे नर्मदा धाकडे इंदुताई सावदेकर रुक्मिणी रामचौरे प्रमिला पुरी शोभा चांगले सुमन पडघन सुमित्रा गाळे बेबी धुळे विद्या खंडेरा सौ चौरे एस मांडवे प्रमिला वाघमारे श्वेता मुरुतकर कांता तायडे सौ सिंधूताई उके पुष्पा वंजारी ममता चोपडे प्रमिला डोईफोडे शिलावैद्य मंदा भटकर रेखा काठोके शारदा चौतमल प्रतिभा चव्हाण माया सुखदेवे एडवोकेट नागदे नागदेवे रेखा देशमुख पुष्पा वानखडे बेबीताई बोंडे प्रमिला भिसे मंदा तंतरपाळे आदींचा समावेश होता
संघटनेचे अध्यक्ष सत्यनारायण बाहेती यांनी जागतिक महिला दिनानिमित्त वर्षातून फक्त एकदाच स्त्रियांचा जयजयकार आणि सन्मान न करता नेहमी त्यांच्या प्रति आदर आणि सन्मानाची भावना सर्वांनी ठेवायला पाहिजे असे सांगून सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या
प्रमुख अतिथी डॉ आशा निकते यांनी महिलांनी परिवारातील सदस्यांचे काळजी करताना स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होते त्याकरिता स्वतःच्या शरीर प्रकृतीकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे त्याकरिता काय काय केले पाहिजे कोण कोणत्या व्हॅक्सिन घेतल्या पाहिजेत नेहमी सकारात्मक विचारसरणी आणि नियमित तपासणी आणि मेंदूला सतत कार्यशील ठेवणे लठ्ठपणा टाळणे योगा करणे आदी बाबींवर मार्गदर्शन करून पुरुषांनीही गृहिणीच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले आणि सर्व महिला सभासदांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन द्वारे करण्यात येणाऱ्या कार्याचे कौतुक केले
याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम बुटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
सचिव एकनाथराव उके यांनी सर्वांचे स्वागत करून 23 मार्च ला रविवारी सकाळी दहा वाजता शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात आयोजित करण्यात येणाऱ्या आम सभे बाबत माहिती देऊन त्यात जास्तीत जास्त संख्येने सदस्यांनी उपस्थित राहण्याबाबत बाबत आवाहन केले आणि सर्वांचे आभार मानले
याप्रसंगी संघटनेचे जेष्ठ सदस्य मुरलीधर निर्वाण मोतीराम राम चौरे किशोर बुटोले चंद्रशेखर मीसुरकर प्रल्हाद इंगळे सुनील खोत सुरेश अग्रवाल गुरुजी रमेश डागा अजय जागीरदार आदि मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला सदस्य उपस्थित होते.