कारंजा : आता राज्यात आणि संपूर्ण देशात बहुसंख्येने असलेल्या बंजारा समाजाला देखील,हैद्राबाद गॅझेट प्रमाणे एस टी प्रवर्गाचे आरक्षण हवे असून त्याकरीता दि २९ सप्टेंबर २०२५ रोजी, संपूर्ण जिल्ह्यातील बंजारा समाजाचा महामोर्चा वाशिम जिल्हा कचेरीवर धडकणार आहे. त्यासाठी बंजारा समाजाच्या गावोगावी बैठकी आयोजीत केल्या जात असून, महामोर्चाची रणनिती आखण्यासाठी नुकतीच धोत्रा जहागीर येथे बंजारा कर्मचारी संघटना कारंजा व गांवकरी ग्रामस्थांची बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी सभा घेण्यात आली.सभेला प्राचार्य टी.व्हि.राठोड सर,प्रा.पि.डी.राठोड सर ,प्रा.वसंत राठोड सर,गोर सेना तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, सुनील राठोड, अनिल जाधव, मोहन जाधव, किशोर पवार, भास्कर राठोड, अशोक राठोड, कारभारी माणिकराव आडे, तुकाराम आडे, सुरेश आडे, ज्ञानेश्वर राठोड, राजेश पवार, बापुराव आडे, देवराव चव्हाण, दिनेश राठोड,भाऊराव आडे,शाम चव्हाण,मोरसिंग चव्हाण, मोतीलाल राठोड,घासीरामजी चव्हाण, अनिल च.राठोड, गजानन राठोड, निलेश र.पवार,पंकज राठोड, तुषार पवार, मनिष चव्हाण, ऋषी पवार, अभिषेक पवार इ.बरीच मंडळी उपस्थित होते.मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी शांताराम पवार यांनी सर्व गांवकरी मंडळीना आरक्षणावर माहिती व दि. २९/०९/ २०२५ ला वाशिम जिल्हा मोर्चा उपस्थिती बद्दल यशस्वी नियोजन करण्यासाठी सांगितले. खेळीमेळीच्या वातावरणात बैठकी यशस्वी पार पडली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....