कारंजा : तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, करंजा (लाड) आणि फिटनेस रफ अँड टफ ग्रुप कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने “समर कॅम्प २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्पचे आयोजन हे २० मे ते २६ मे २०२५ दरम्यान दररोज सकाळी ५.४५ ते ७.१५ या वेळेत तालुका क्रीडा संकुल, बायपास, कारंजा येथे होईल.
८ ते ८० वयोगटातील महिला, पुरुष व लहान मुलांसाठी खुला असलेला आहे.
या कॅम्पमध्ये सहभागींसाठी योग व प्राणायाम, अॅथलेटिक्स, कराटे, व्हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, फुटबॉल, कॅरम, खो-खो, विटी दांडू, लेझीम यांसारख्या क्रीडा प्रकारांसह विविध पारंपरिक खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच, झुंबा डान्स हे या कॅम्पचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
नोंदणी प्रक्रिया १३ मे ते २१ मे २०२५ या कालावधीत सुरू राहणार असून,
प्रवेश मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....