अकोला : स्थानिक आस्था फाउंडेशन व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी जानोरकर भवन अकोला येथे दिव्यांग जनजागृती कार्यक्रम आयोजित केला गेला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था योग फाउंडेशन अकोला चे मार्गदर्शक डॉ.चंद्रकांत अवचार , प्रमुख अतिथी म्हणून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे , सदस्य अस्मिता मिश्रा व प्रा.नानासाहेब सपकाळ उपस्थित होते . डॉ.विशाल कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने कार्यरत असणाऱ्या सामाजिक उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली . दिव्यांगांच्या समस्या व रोजगार निर्मिती याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली . येणाऱ्या सण समारंभात दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेली विविध उत्पादने खरेदी करून त्यांना रोजगार द्यावा असे आव्हान डॉ.चंद्रकांत अवचार यांनी केले . यावेळी दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या राख्या व विविध पूजा साहित्याची खरेदी करून योगसाधकांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन ला सहकार्य केले . *ज्या दिव्यांगांना संस्थेचे सदस्य होऊन कार्य करायचे आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान वैशाली दातकर यांनी केले* . या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनामिका देशपांडे, विजय कोरडे, तन्वी दळवे, सारिका उगले, अनुराधा साठे, अदिती वाडे,निर्जला तायडे व योग साधकांनी आपले भरीव सहकार्य दिले .