वर्धा:-
पोलिस अधिक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने आयपीएल क्रिकेट बुकीवर छापा टाकून, मुख्य आरोपी सुनिल मधुकरराव सावरकर याला अटक केली.
संपूर्ण भारतात ३० मार्चपासून आयपीएल क्रिकेट लिग खेळवल्या जात आहेत.
क्रिकेट मॅचवर लोक पैशाचे खेळ खेळतात. त्याचप्रमाणे सेलू तालुक्यातील टाकळी (झ.) येथील सुनिल मधुकराव सावरकर (रा. टाकळी (झ.) हा क्रिकेट मॅचवर सट्टा खेळत होता. त्यावरून पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी क्राईम इंटेलिजन्स पथकास विशेष सूचना देवून, क्रिकेट बुकींवर धडक कारवाई करण्याचा आदेश दिला.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार, ३ एप्रिल रोजी क्राईम इंटेलिजन्स पथकास गोपनिय माहिती मिळाली की, मौजा टाकळी (झ.) (ता. सेलू, जि. वर्धा) येथील सुनिल सावरकर हा एनआयसीई या मॅच आयडीवरुन काही लोकांकडून क्रिकेटच्या मॅचवर हार-जीतचा खेळ खेळवत आहे. त्यावरुन संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतली असता, ही व्यक्ती त्याच्या घराच्या आजुबाजूच्या परिसरातून मॅचवर बेटींग करण्याचे काम करतो.
याबाबतची सर्व माहिती मिळवून त्याच्यावर छापा कारवाई करुन, त्याच्या मोबाईलची पडताळणी केली असता त्यामध्ये NICE 24 pro या आयडीमध्ये १५ लाख
रुपये, TATA 999.fun या आयडीमध्ये ५० लाख रुपये, तसेच Dubai exchange.in या आयडीमध्ये १० लाख रुपये असे क्रेडीट असल्याचे दिसून आले. दरम्यान, आयडीमध्ये कोणकोण व किती क्लायंट आहेत, याबाबत संपूर्ण माहिती घेतली. त्यामध्ये क्रिकेट मॅच दरम्यान ऑनलाईन पद्धतीने त्याचे एकूण १६ सहकाऱ्यांसह.. नावे पुढीलप्रमाणे : कपूर कराटे (रा. सेलू), अमोल उमाटे (रा. सेलू), अनिल बिलदाने (रा. सेलू), तुषार लोखंडे (रा. सेलू०, घन:शाम संगताणी (रा. सेलू), अवि डांगे (रा. सेलू), शैलेश पेटकर (रा. सेलू), आसिक भाई (रा. पुलगाव), मयूर येंडे (रा. पुलगाव), निरज ढगे (रा. पुलगाव), निलेश घवघवे (रा. केळझर), श्रेयश बाजायीत (रा. केळझर), सूरज तेलरांधे (रा. केळझर), गणेश दांडेकर (रा. केळझर०, संजय उमाटे (रा. घोराड) हे आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान ऑनलाईन क्रिकेट जुगाराचा हार-जीतचा खेळ चालवित असताना आढळून आले.
यातील आरोपीतांचे कृत्य हे महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये होत असल्याने त्यांच्याविरुद्ध पोस्टे सेलू येथे मजुका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयातील आरोपींच्या ताब्यातून बेटींगसाठी वापरलेला वन प्लस अॅन्ड्रॉईड मोबाईल किंमत १५ हजार रूपये, रिअल-मी ॲन्ड्रॉईड मोबाईल किंमत ६ हजार रूपये, नगदी ९२,४०० रूपये असा एकूण जुमला किंमत १,१३,४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
पुढील कारवाई सेलू पोलिस स्टेशन करीत आहे. संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांच्या प्रत्यक्ष हजेरीत पोलिस अंमलदार रोशन निंबाळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख,अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, स्मिता महाजन, अंकीत जिभे, प्रफुल वानखेडे सर्व क्राईम इंटेलिजन्स पथक, वर्धा यांनी केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....