नागभीड ---येथील जिल्हा परिषद प्राथमिक बेशीक शाळा नागभिड येथील शाळा व्यवस्थापन समीतीने स्नेहमिलन व निरोप समारंभ आयोजीत केला होता. शाळा व्यवस्थापन समिती मध्ये अनेक वर्षा पासुन शाळेसाठी झटणारे समितीचे अध्यक्ष अरुण रामुजी भोले ,मा,नथ्थुजी येसनसुरे सदस्य यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे सत्कार मुर्ती नथ्थुजी येसनसुरे, चंद्रपुर जिल्हा मधुन भंडारा येथे बदली करुण गेलेले मुख्याध्यापक मा,भालंचद्र खंडाळे,शिक्षीका सौ, सुंदरा खंडाळे यांचा सप्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी प्राचार्य नथ्थुजी येसनसुरे, भालचंद्र खंडाळे अनेक मुद्यावर त्यांनी बोट ठेवले.
आपला अनुभव कथन करतांनी ते भारावुन गेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागभीड येथील बिट केंद्र प्रमुख कोटकोंडावार ह्या होत्या. त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याधापीका श्रिमती कल्पना भाकरे यांनी केले. तर आभार समितीचे अध्यक्ष अरुण भोले यांनी केले. मानले ,कार्यक्रमास पञकार संघाचे मान्यवर महोदय तसेच शाळा समितीचे जुने व नविन सदस्य उपस्थित होते,