अकोला--कठिण काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया घातला.विद्येची खरी देवता सावित्रीबाईची जयंती उत्सव म्हणुन सर्वत्र साजरी करा असे प्रतिपादन बबनराव कानकिरड यांनी केले आहे.
आरोग्य ज्ञान वर्धीनी संस्था द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय, गोकुळ कॉलनी, अकोला येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महादेवराव भुईभार होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी तळोकार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा कुकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीसुर्य महात्मा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांचे दैवत आहेत.त्यांचे साहित्य वाचा.सावित्रीबाईची जयंती उत्सव म्हणुन साजरी करतांना विविध क्षेत्रातील कष्टकरी महिलांचा सन्मान करावा व गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करावा असे आवाहन बबनराव कानकिरड यांनी याप्रसंगी केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ.तळोकार यांनी प्रास्ताविकातून दिली.
आरव डोंगरे व अथर्व इंगळे यांची याप्रसंगी समयोचित भाषणे झाली.आर्यन इंगळे याने सुंदर गीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी सुंदर भाषण देणारे, गायक, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन सौं. ज्योती इंगळे यांनी केले.
"माणसाने माणसाशी माणसासम वागणे" या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी,पालक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.