कारंजा (लाड) -- कारंजा बघेरवाल मैत्री महिला मंडळाच्या वतीने दिनांक २५ ऑगस्ट सोमवार रोजी प.पू १०८ आचार्य श्री. शांतिसागरजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत प पू १०८ आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांचे प्रतिमेसमोर दीप प्रज्वलनानंतर बा.ब्र. भारतीदिदी यांचे आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या जीवन चारित्र्यातील काही प्रसंगावर उद्बोधन झाले. महिला मंडळाच्या वतीने संयमाच्या मार्गावर अग्रेसर असणाऱ्या भारतीदींदीचा सन्मान करण्यात आला . तसेच श्री बालात्कार( गण) दिगंबर जैन मंदिरातील जिनवाणी संवर्धनाच्या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात प्रफुलभाऊ आग्रेकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. त्यानंतर मैत्री महिला मंडळाच्या वतीने व एकता भजनी मंडळ यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत बालकांचे नृत्य धार्मिक गीते व परमपूज्य १०८ श्री. शांतिसागरजी महाराजांच्या जीवन चरित्रावर पोवाडा सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मैत्री महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली खंडारे, प्रमुख अतिथी म्हणून बालब्रह्मचारी भारतीदिदी, मंदिर समितीचे सचिव उज्वल रायबागकर कारंजा शाखेचे अध्यक्ष राजेंद्र खंडारे, स्पर्धेचे परीक्षक कवीश गहाणकरी व वाकडे सर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते खालील यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
रक्षाबंधन पर्वा निमित्त आयोजित शास्त्र सजावट स्पर्धा व शुभ लाभ हँगिंग स्पर्धा - खुला गट :
शास्त्र सजावट स्पर्धकांची नावे
१. सौ अवंती चवरे
२. सौ सायली नांदगावकर
३. सौ सरोज हरसुले
प्रोत्साहनपर बक्षीस -
शास्त्र सजावट :
१. सौ.जयश्री जोहरापूरकर
२.सौ शितल रुईवाले
खुला गट -शुभ लाभ वॉल हैंगिंग :
१. सौ सायली नांदगावकर
२. सौ अवंती चवरे
३. कु. दीपल नांदगावकर
बालगट-शास्त्र सजावट स्पर्धा :
१. कु. आराध्या रुईवाले
२. अनुदेश जोहरापूरकर
बालगट-वॉल हैंगिंग स्पर्धा
१. कु.इशा गहाणकरी
२.विराज चवरे
सर्वच ७७ स्पर्धकांनी ग्रंथांची उत्तम सजावट केली होती. त्याचप्रमाणे शुभ लाभ वॉल हैंगिंग ही आकर्षक व सुंदर होते, त्या सर्व ग्रंथांची व वॉल हैंगिंगची प्रदर्शनी देखील आयोजित करण्यात आली होती. प्रदर्शनी पाहण्यासाठी श्रावकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या सर्व कार्यक्रमासाठी श्री. बालात्कार( गण )दिगंबर जैन मंदिर समिती ट्रस्टने भरपूर सहयोग दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री जोहरापूरकर यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल रुईवाले यांनी केले आभार प्रदर्शन स्मृती चवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या अध्यक्ष वैशाली खंडारे सचिव शितल रुईवाले,प्रकल्प प्रमुख जयश्री जोहरापूरकर, मंजूषा खंडारे व चित्रा मिश्रीकोटकर तसेच सर्व महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.