ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील खंडाळा हद्दीत सुरू झालेल्या भावेश बार अन्ड रेस्टॉरंट हे वादग्रस्त ठरले आहेत. यासाठी महिला व पुरुष एकवटून बार बंद करण्यासाठी ग्रामसभा घेऊन एकमताने ठराव मंजूर करण्यात आले. खंडाळा ग्रामपंचायत येथून विलास सुकलदास धोटे यांनी रितसर पणे उपहार गृहाच्या नावाखाली ना हरकत प्रमाणपत्र घेतले. व ग्रामपंचायत मधील संपूर्ण सदस्या ची दिशाभूल करुन एक ही दिवस उपहार गृह न चालविता . अचानक भावेश बार अन्ड रेस्टॉरंट सुरू करण्यात आले. सदर बार मुळे गावातील व्यसनाचे प्रमाण वाढणार असून गुन्हेगारी प्रवृत्ती ला वाव मिळणार आहे. गावातील तरुण गावात बार असल्यामुळे व्यसनाकडे अधीन होणुन विकृत मानसिकतेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर रस्त्यावरून खंडाळा, चांदली, कहाली, कन्हाळगाव, गावातील होतकरू विद्यार्थी ट्युशन वर्ग व शालेय शिक्षण घेऊन रात्रीच्या ९:०० वाजता पर्यंत अवमान करत असतात. सदर बारच्या आजुबाजूला वस्ती नसल्याने विद्यार्थी व महिला ना भीतीदायक वातावरणात अवमान करावे लागत आहे. जर ज्या गावात बार सुरू करायचे आहे त्यांना ग्रामपंचायत मधील ग्रामसभेचा ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसावी का? कोणी कुठेही कसा काय बार सुरू करू शकतो असा प्रश्न जनमानसात उपस्थित होत आहे.
सदर दारू विक्री बार च्या विरोधात गावातील सुशिक्षित नागरिकांनी विरोध केला आहे. पण बार मालकांच्या पाठी मागे राजकीय ताकद उभी असल्याने आज मुजोरीने बार सुरू करून परिसरात नशेच्या स्वरूपात संपूर्ण गाव उध्वस्त करायला तयार आहे. सदर भावेश बार एन्ड रेस्टॉरंट तत्काळ बंद करा अन्यथा मोठे आंदोलन सुरू करून बार ला सील करण्यात येईल. अशा मागणी चे निवेदन जिल्हाधिकारी विनय गौडा यांना देण्यात आले. यावेळी संरपच अर्चना डेंगे, उपसरपंच पींन्टु रागडे, सदस्य अमरदीप राखडे, पोलीस पाटील वाघमारे, विदया मेश्राम, शालू राखडे, पुष्पलता राखडे, नरेंद्र राखडे माजी सरपंच, ईश्वर दिघोरे तंटामुक्ती अध्यक्ष, प्रीतम वाघधरे पो. पा. , बघू राखडे, दिपाली डेंगे आदी नागरिक उपस्थित होते.