कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांचेशी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी संवाद साधून पिकपरिस्थिती बाबत विचारणा केली असता, हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी सांगीतले,मी तर फक्त हवामानाचे अंदाजच व्यक्त करीत असतो आणि त्यामध्येही महत्वाचे म्हणजे माझे अंदाजच असतात.केव्हा केव्हा बहुतांश अचूकही ठरतात.परंतु केव्हा केव्हा हवेत अचानक बदल झाला.म्हणजेच वाऱ्याची दिशा बदलली तर वेळ,ठिकाण,दिशा, भाग यामध्ये बदल संभवत असतो.असेच पिक परिस्थितीचे असतात.शेतजमिनीचे म्हणजे सपाट जमिन,बरडाची जमिन आणि नदी नाल्याकाठची डाबरीतील जमिन या जमिनी नुसार पिके बहरत असतात.या वर्षी आतापर्यंत आलेल्या पावसाने मात्र आहे त्या पिकाची परिस्थिती समाधानकारक असून, सोयाबीन पिक समाधान देणारे चांगले पिक होण्याचा अंदाज आहे. हवामाना बाबत बोलतांना ते म्हणाले की,येत्या 3 ऑगष्ट रोजी रात्री पाऊस पडणार,4 ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस,13 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरु होणार.हवामान अंदाजानुसार,1 ते 4 ऑगस्ट महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.8 ऑगष्ट ते 11 आगस्ट पाऊस पडणार.यापुढे राज्यामध्ये ऊन आणि पाऊस अशा पद्धतीचा पाऊस पडेल.
15 मिनिट ते अर्धा तास अशा सऱ्या अधून मधून येत राहतील.
महाराष्ट्रामध्ये 13 ऑगस्ट च्या रात्री पाऊस पडणार 14 ऑगष्ट रोजी दिवसा पाऊस पडणार मात्र आता सततधार / मुसळधार पाऊस पडणार नाही.नंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल. पाऊसाचे प्रमाण मात्र कमी असणार परंतु शेतजमिनीतील पिकाला सध्यातरी अनुकूल राहणार असल्याचे त्यांनी कळवीले आहे.