वरोरा कृषी उत्प उत्पन्न बाजार समिती याचा निकाल आज दिनांक 29 एप्रिल रोजी घोषित करण्यात आला यामध्ये शेतकरी सहकार पॅनलचे सहकारी संस्था मतदार संघ (सर्वसाधारण) गटातून डॉ विजय रामचंद्र देवतळे यांना401, जयंत मोरेश्वर राव टेंमुर्डे यांना 349, दत्ता बबनराव बोरेकर यांना281, विठ्ठलराव त्र्यंबकराव भोयर यांना276, अभिजीत गिरीधर पावडे 274, सहकारी संस्था मतदार संघ (महिला )गटातून कल्पना ओकेश्वर टोंगे 343, संगीता वासुदेव उरकांदे332, सहकारी संस्था मतदार संघ (इ मा व) गटातून राजेश वामनराव देवतळे419, सहकारी संस्था मतदारसंघ(वि. जा/भ.ज) गटातून विकास शालीक झिले याना432, तर शेतकरी विकास पॅनलचे सहकारीसंस्था मतदान संघ(सर्वसाधारण)गटातूनदिनेश महादेव कष्टी261,ग्रामपंचायत मतदारसंघ(सर्वसाधारण)गटातून राजेंद्र नत्थुजी चिकटे 282,गणेश दामोदर चवले275,ग्रामपंचायत मतदार यादीत संघ(अनु जाती/जमाती)गटातून हरिदास रघुनाथ जाधव 308,ग्रामपंचायत मतदार संघ( आर्थिक दुर्बल घटक)गटातून संभा पुरुषोत्तम पावडे298, अडते व व्यापारी संघ गटातून नीरज शंकरलाल गोठी65, प्रवीण मालकचंद मालू64, हमाल व मापारी मतदारसंघातून सोनबा पांडुरंग झाडे 37 हे विजयी झाले, सहकारी संस्था मतदार संघ (सर्वसाधारण) गटातून अपक्ष उमेदवार नितीन केशव मत्ते 252 मतांनी विजयी झाले, शेतकरी सहकार पॅनल कडे नव उमेदवार तर शेतकरी विकास पॅनल कडे आठ उमेदवार असल्याने आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाची सत्ता बसणार हे अपक्ष उमेदवाराच्या मतदानावर अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे