कारंजा (लाड) :
श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयामध्ये सन 2017 पासून संस्थेचे अध्यक्ष माजी
मंत्री स्वर्गीय बाबासाहेब धाबेकर यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सुभाष गवई
यांनी महाविद्यालयातील ध्वजारोहण कष्टकरी दिव्यांग पालकांच्या व होतकरू दिव्यांग
विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्याची अभिनव परंपरा सुरू केली होती या अभिनव परंपरेला
जतन करत यावर्षी देखील दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण होतकरू दिव्यांग
विद्यार्थी अ. झुबेर अ.नासीर यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या ध्वजारोहानाचा
मान मिळविणारे ते पंधरावे मानकरी ठरले आहे.
प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील धाबेकर यांची प्रमुख उपस्थिती
होती. दिव्यांग विद्यार्थी अ. झुबेर अ.
नासीर महाविद्यालयाच्या एम. ए. मराठी विषयाला प्रवेशित असलेला हा विद्यार्थी जन्मापासून पोलियो
ग्रस्त आहे. तो कारंजा लाड शहरातील सिदरा या कॉलोनीत राहतो. त्याने आपल्या दिव्यांगावर मात करत
जिद्द व चिकाटीने एम. ए. राज्यशात्र व बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले आहे. सोबतच तो
हैप्पी किड्स प्रियदर्शनी कॉन्व्हेंट कारंजा या ठिकाणी मराठी विषयाचा शिक्षक
म्हणून कार्यरत आहे. त्याच्या प्रेरणादायी प्रवासामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू
शकेल या भावनेतून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय प्राचार्य डॉ. सुभाष
गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते घेण्यात आला होता. ते या अभिनव परंपरेचे पंधरावे
मानकरी ठरले आहे. आपले मनोगत व्यक्त करतांना अ. झुबेर म्हणाले की, महाविद्यालयाने माझ्या हस्ते ध्वजारोहण करून माझ्या जीवनाचे सोने केले आहे. ज्या महाविद्यालयात विद्यार्थांचा एव्हढा मोठा सन्मान होतो ते महाविद्यालय खरोखच महान आहे. प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, या देशात जनतेच्या हाती सत्ता असलेली शासन व्यवस्था आहे. सामान्य माणसाला यांची शाश्वती वाटावी म्हणूनच हा प्रयोग महाविद्यालयाच्या वतीने हा संकल्प राबविला जातो.
या सोहळ्यास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य भुजंगराव वाळके, दिलीप काळे, कारंजा शहरातील प्रतिष्ठित नागरिक
अशोक पाटील दहातोंडे, जुम्माबाई
पप्पू वाले, अ. नासिर
भाई, संजय कडोळे, एम टी खान, अब्दुल मस्जिद यांची प्रमुख
उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कैलास गायकवाड, डॉ अशोक जाधव, प्रा. उमेश कुराडे, डॉ.योगेश पोहोकार, प्रा. राहुल रडके, प्रा. पराग गावंडे,प्रा. नितेश थोरात, प्रा. लक्ष्मि तेलगोटे, अलोलिका पारधी, प्रा, प्रियंका खडसे, राजेश आढाऊ, उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राऊत, प्रकाश लोखंडे, अरुण ईसळ, सुनील राजगुरे यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....