पुणे दि,. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव (पेरणे फाटा) येथील विजय स्तंभाच्या शौर्य दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज .छत्रपती शाहू महाराज .महात्मा ज्योतिबा फुले .डॉ बाबासाहेब आंबेडकर .लोकशाहीर अण्णाभाऊ साठे .वस्ताद लहुजी साळवे .फकिरा साठे वीर योद्धा गोविंद गायकवाड . आणि भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ शौर्याचे शिल्पकार सिदनाक महार यांच्यासह अनेक महापुरुषांच्या वशांजाचा परिचय मेळावा आणि सत्कार समारंभाचे मान्यवराच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दल आणि वीर गोविंद गोपाल गायकवाड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी भीमा कोरेगाव (पेरणे फाटा )विजयस्तंभ परिसर येथे करण्यात आले आहे
बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे आणि वीर गोविंद गोपाल गायकवाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेश राजेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे महासंचालक धम्मज्योती गजभिये साहेब यांना भेटून निवेदन देऊन महापुरुषांच्या वशंजाचा परिचय मेळावा आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाला परवानगी द्यावी अशी मागणी केली असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे आणि वीर गोविंद गोपाल गायकवाड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष जयेश गायकवाड यांनी सांगितले असून
महासंचालक धम्मज्योती गजभिये साहेब यांनी निवेदन स्वीकारून दिलेल्या निवेदनावर विचार विनिमय करून लवकरच सदर कार्यक्रमाला परवानगी देण्यात येणार असे आश्वासन महासंचालक धम्मज्योती गजभिये साहेब यांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे आणि वीर गोविंद गोपाळ गायकवाड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष जयेश गायकवाड यांना दिले