घुग्घूस (चंद्रपूर) : एसिसी सिमेंट कंपनीत पॅकिंग प्लांट मध्ये कार्यरत हरिदास मोहजे वय 45 वर्ष यांचा 20 जुलै रोजी सकाळच्या पाळीत कार्यरत असताना प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा हृदयघाताने दुर्दैवी मृत्यू झाला.
कंपनी सोबत मोबदला संदर्भात वाटाघाटी फिस्कटल्याने सर्वपक्षीय संतप्त नेत्यांनी कुटुंबासह कामगारांचा मृतदेह कंपनीच्या मुख्य गेट समोर ठेवून आंदोलनास शुरुवात केली.
चार तास करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाले कंपनी अधिकारी गुप्ता, पुष्कर चौधरी यांच्या सोबत सर्वपक्षीय नेते राजूरेड्डी काँग्रेस अध्यक्ष, रोशन पचारे किसान जिल्हाध्यक्ष, देवेंद्र गहलोत महासचिव इंटक संघटना, पवन आगदारी माजी जिल्हाध्यक्ष एस्सी सेल, सैय्यद अनवर कामगार नेता, सुरेश पाईकराव महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस, विजय क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत पंधरा लाख रुपयेचे धनादेश तात्ळीने देण्यात आले चाळीस दिवसाच्या आत उर्वरित सत्तावीस लाख रुपये व मुलाला कंपनीत स्थायी स्वरूपात नोकरी मंजूर केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलीस उप - निरीक्षक संजय सिंग, पोलीस उप - निरीक्षक यांनी शांती व सुव्यवस्था अबाधित ठेण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला.