कारंजा : तत्वज्ञानाच्या गाढे अभ्यासिका आपल्या विद्वतापूर्ण प्रवचनाद्वारे शांत सरळ सोप्या भाषेतून सत्संग करणाऱ्या,श्री पंचमुखी हनुमान आश्रम, (त्र्यंबकेश्वर रोड)ग्राम इंदोरे ता. दिंडोरे जि.नाशिक येथील मठाधिश, महान सिद्ध साध्वी महंत भगवत्दास त्यागी श्री श्री १००८ विजयादेवीजी गुरु श्री राजारामदासजी यांचा,श्रीक्षेत्र कारंजा येथील बालाजी नगर भाग-२ येथील श्री साईबाबा वाटिका मंदिर कारंजाचे भेटी दरम्यान,मराठा सेवा संघ प्रणित,संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद सांस्कृतिक विभाग कारंजा,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि करंजमहात्म्य परिवाराकडून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने संजय कडोळे गुरुजी, लोमेश पाटील चौधरी,नंदकिशोर कव्हळकर, डॉ.ज्ञानेश्वर गरड, रामदास कांबळे, विजय पाटील खंडार, रामबकस डेंडूळे, गोपिनाथ डेंडूळे,ओंकार मलवळकर,देवमन मोरे,उमेश अनासाने, कैलास हांडे,रोहित महाजन इ. उपस्थित होते. आपल्या कारंजा भेटी दरम्यान साध्वीजी यांनी श्री गुरुमाउली श्री नृसिह सरस्वती स्वामी संस्थान (श्री गुरुमंदिर), आदिशक्ती श्री कामाक्षा मातृशक्तीपिठ,श्री कामाक्षा देवी संस्थान,गोंधळीनगर कारंजा, सदगुरू संत श्री कैलासनाथ महाराज श्री बालहनुमान मंदिर, संभाजीनगर हायवे कारंजा आणि बंजाराकाशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील श्री जगदंबादेवी संस्थानला भेट दिली असता ठिकठिकाणी भाविक भक्त मंडळी व संस्थानतर्फे त्यांचे आनंदोत्साहात स्वागत करण्यात आले. उद्या त्या श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरी येथे गुरुदेवाच्या दशनार्थ रवाना होणार असल्याचे वृत्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे संजय कडोळे यांनी कळविले आहे .