कारंजा नगरी ही कलानगरी म्हणून जिल्ह्यात ओळखली जात असून,येथील अनेक कलावंतानी आपले नाट्यप्रयोग राज्यपातळीवर यशस्वी केलेले आहेत.शिवाय बऱ्याच कलावंतानी लहान मोठ्या चित्रपटाची निर्मिती सुद्धा केलेली आहे.परंतु दुदैवाने स्वातंत्र्य काळापासून ते आजतागायत कारंजा नगरीमध्ये लोककलावंत व नाट्यकलावंताकरीता स्वतंत्र असे,हक्काचे साधे नाट्यगृह किंवा कोणत्याही प्रकारच्या जाहीर कार्यक्रमा करीता आज रोजी कारंजा येथे साधे व्यासपिठ व गॅलरीयुक्त खुले नाट्यगृह सुद्धा कारंजा नगरीत नसल्या कारणाने कलावंताची सातत्याने उपेक्षाच होत चालली आहे.त्यामुळे अनेक वर्षापासून कारंजेकर शासनाकडे नाट्य सभागृहाची मागणी करीत असून सदर मागणीकडे लोकनेते आणि मतदार संघाचे विद्यमान आमदार सातत्याने दुर्लक्ष्य करीत आहेत.
नुकतीच अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक पार पडलेली असून सदर निवडणूकीतील विजयी उमेद्वार नंदकिशोर अंबादास कव्हळ्कर यांनी कारंजा नगरीतील कलावंताच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टिने नाट्य सभागृहाची समस्या हेरून, हे सभागृह कारंजा नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हावे यासाठी शहरातील विविध सांस्कृतिक संघटनांना एकत्र करीत, अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद, विदर्भ लोककलावंत संघटना, आदर्श जय भारत सेवाभावी संस्था, अविष्कार बहुउद्देशिय संस्था, ईरो फिल्मस् एन्टरटेन्टमेन्ट,जिव्हाळा परिवार इत्यादी संस्थाच्या माध्यमातून, वाशिम लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार भावनाताई गवळी यांनी आपल्या खासदार निधीमधून, तसेच कारंजा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी आपल्या आमदार निधीमधून सहकार्य करावे अशी मागणी करतांना,
कारंजा शहरातील मध्यवर्ती भागातील, जुन्या नगर पालिका मानवी दवाखान्याचे पडीत पडलेली जागा कारंजा नगर पालिकेमार्फत नाट्यगृहाकरीता उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली असून, त्या संदर्भात १)मुख्याधिकारी न.प.कारंजा २) तहसिलदार कारंजा ३) जिल्हाधिकारी वाशिम ४) खासदार भावनाताई गवळी ५ ) आमदार राजेंद्र पाटणी यांचेकडे निवेदन दिले आहे. यामध्ये उल्लेखनिय म्हणजे खासदार भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नंदकिशोर कव्हळकर, संजय कडोळे,अतुल धाकतोड, डॉ.ज्ञानेश्वर गरड,सौ.सिमाताई सातपुते इत्यादी कलावंत मंडळीनी खा.भावनाताई गवळी यांची समक्ष भेट घेऊन, नाट्यगृह किंवा सांस्कृतिक गृहाची कशी गरज आहे हे त्यांना पटवून दिले. नंदकिशोर कव्हळकर यांच्या पुढाकाराने हा प्रश्न कलावंतानी प्रतिष्ठेचा केलेला असून, सदर नाट्यगृहाची मागणी त्वरीत पूर्ण न झाल्यास येत्या लोकसभा विधानसभा निवडणूकीवर कारंजेकर कलावंत मंडळी बहिष्कार टाकू शकतात. त्यामुळे नाट्यगृहाची मागणी पूर्ण होणे आवश्यक आहे. या संदर्भात बोलतांना विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे म्हणाले की, "खा.भावनाताई गवळी यांनी सांस्कृतिक सभागृहाकरीता स्वतः जातीने पुढाकार घेतल्यास हे नाट्यगृह उपलब्ध होऊ शकते.