अकोला :- सार्वजनिक पालखी उत्सव समिति,अशोक नगर, तर्फे मा.आयुक्त महानगर पालिका अकोला व उत्तर झोन अधिकारी देवकते साहेब यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली होती की,श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवार व सोमवार या दिवशी गांधीग्राम कडून अकोट फैलाकड़े येणाऱ्या शिवभक्त व कावडधारी शिवभक्त यांना पायी चालताना कुठलीही दुखापत झाल्यास त्यांना त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता अशोकनगर येथील आयर्वेदिक दवाखाना सुरु ठेवण्याकरिता मागणी केली होती.मा.आयुक्त व उत्तर झोन अधिकारी देवकते साहेब यांनी त्वरित निवेदनाची दखल घेत रविवार व सोमवार या दिवशी दवाखाना सुरु ठेवला . पालखी उत्सव समितीचे पदाधिकारी सर्वश्री शरद तुरकर ,डॉ प्रेमशंकर तिवारी ,अशोक रामटेके ,सचिन आयवले , भाऊराव साबले ,रामकृष्ण गोपनारायन ,दिनकर रनबावले ,रमेश करिहार , नारायण मकोरिया , विनय ओव्हल , सुमंत आवले यांनी दवाखान्याला भेट दिली असता दवाखाना सुरु होता ।समितीच्या पदाधिकारी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले । यावेळी कर्मचारी श्री शेख इमरान समद ,श्री अंकुश धूड़ ,श्री मनीष मेश्राम ,दीपक टोपरे , गजेंद्र कावल ,लताबाई सत्याल ई कर्मचारी उपस्तिथ होते ।