संतश्रेष्ठ श्री रविदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कारंजा येथे त्यांचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कारंजा तालुका शाखेच्या वतीने नितीन राजगुरे यांच्या शिंदे- शहाकारनगर मधील निवासस्थानी दि.20 डिसेंबर 2023 रोजी आयोजित या अभिवादन कार्यक्रमाला प्रामुख्याने पत्रकार ज्ञानेश्वर घुडे,महादेव पिंगळे,यदुराज राजुस्कर, नारायण काटकर, देविदास जोगे, मधुकरराव सोनटक्के, देवलाल बोर्डे ,रवींद्र इंगळे, प्रल्हादराव पानझाडे,महादेवराव अंबाळकर, पांडुरंग गव्हाळे, गणेशराव भटकर,सुनील राजगुरे, नारायण शेगोकार, बाबाराव वानखडे, गजानन राजगुरे, राजू ठोसरे, श्रीकांत माने, मुकुंद इंगोले ,संदीप राजगुरे, नितीन राजगुरे, खुशाल राजगुरे उपस्थित होते.