अकोला:-
नशाबंदी मंडळाचे रेल्वे प्लॅटफॉर्म क्र.१वर पोस्टरद्वारे जागर
आपल्या देशात अमली पदार्थाचे वाढते सेवन ही भयावह समस्या उभी ठाकली आहे. अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी केले.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व मध्य रेल्वे, सर्वोदय मंडळ यांचे वतीने अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रदर्शनीचे कार्यक्रमात बोलत होते. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार, श्रीकृष्ण विखे पाटील, अकोला रेल्वे स्टेशन प्रबंधक संतोष कवडे, नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक बबनराव कानकिरड, प्रा. दत्तात्रय भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजश्री शाहू महाराज जयंती दिनी 26 जून हा दिवस अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. नशाबंदी मंडळ अकोला ची वतीने अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर अमली पदार्थ व व्यसनांचे दुष्परिणाम बाबतची पोस्टर प्रदर्शनी द्वारे जनजागरण करण्यात आले होते.
अंमली पदार्थांच्या व्यसनांपासून तरुणाईला परावृत्त करण्यासाठी नशाबंदी मंडळाचे वतीने 26 जून पासून जिल्ह्यातील शाळा कॉलेज व गर्दीच्या ठिकाणी पोस्टर प्रदर्शनाद्वारे अमली पदार्थ विरोधी जागर करण्यात येत असल्याची माहिती नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक बबनराव कानकिरड यांनी दिली.
अकोला रेल्वे स्टेशन प्रवाशांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी नेहमी सजग राहिले आहे. चाईल्ड केअर सारखा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून राबवून प्रवाशांचे प्रबोधन केले जात असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक संतोष कवडे यांनी दिली .
प्रवाशांना अमली पदार्थांचे व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करणारे पत्रके वाटप करण्यात आली. शीघ्र कवी तेजीराव भिसे, रामराव पाटेखेडे व संतोष बर्गे यांनी व्यसनमुक्ती वरील सुश्राव्य कविता सादर केल्या.
स्टेशन सहाय्यक मनोज पहूरकर , स्वास्थ्य निरीक्षक शिवकुमार माळी, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक रजनीकांत, राज्य लोहमार्ग पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे ,चाइल्ड केअर चे सुपरवायझर पद्माकर सदाशिव, स्वप्निल शिरसाठ,तिकीट निरीक्षक संघदीप वानखेडे, कृष्णकांत पांडे, जयकुमार जमदाडे, अनिल धाडसे, मोहम्मद अली, अशोक रामटेके ,सर्पमित्र बाल कालणे ,आकाश इंगळे यांचे सह सर्वोदय , नशाबंदी मंडळाचे कार्यकर्ते व व्यसनमुक्त युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सर्वोदय मंडळाचे सचिव डॉक्टर मिलिंद निवाने यांनी केले .आभार प्रदर्शन अनिल मावळे यांनी केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....