कारंजा (लाड) : येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र रामगाव (रामेश्वर) येथे रामापूर योगी मठ येथे प.पू.सिद्ध सद्गुरु सेवानाथ महाराज गुरु मोहननाथ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त,महंत मठाधिश सिद्ध सद्गुरू अभेदनाथ महाराज गुरु सेवानाथ महाराज यांच्या मार्गदर्शनात,यवतमाळ जिल्हा शिवसेना (शिंदे) जिल्हा प्रमुख यशवंत पवार गुरुजी यांच्या हस्ते महाभिषेक,शंखढाल पूजन, महाआरती व महाप्रसाद भंडाऱ्याचा भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांचेशी सवांद साथतांना,जिल्हा शिवसेना ( शिंदे) चे जिल्हा प्रमुख यशवंत पवार गुरुजी यांनी सांगितले की," सदहू रामापूर योगी मठ संस्थानचा परिसर आणि अडाण माता ( अडाण नदी ) परिसराच्या नदी घाट,मठ रस्ता व परिसर सौंदर्यी करणाकरीता शासनाकडून पर्यटन विकास आराखड्या अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच विकास कामे सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शिवसेना (शिंदे) चे जिल्हा प्रमुख यशवंत पवार गुरुजी यांनी दिली. त्यामुळे पंचक्रोशीतील वाशीम यवतमाळ जिल्ह्यातील उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले.या संदर्भात अधिक वृत्त असे की,विदर्भातील,पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,विध्यांचल पर्वतरांगेतील औषधी वनातील त्रिवेणी संगमावर,उत्तरवाहिनी अडाण माता (अडाण नदी) वाहते.स्कंद पुराणातील संदर्भानुसार ह्या जागेला प्रयागराज किंवा त्र्यंबकेश्वर एवढेच महत्व असल्यामुळे ही भूमी प्रत्यक्ष श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून येथे त्रीदेवाचा,नवनाथाचा,रामदूत हनुमंत रायाचा वास आहे. शिवाय सिद्ध गुरु रामनाथ महाराजांनी या ठिकाणाची निवड आपल्या तपश्चर्ये करीता ह्या जागेची तपोभूमी म्हणून निवड करून आपला आश्रम या ठिकाणी केला. त्यामुळे त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने आणि तपोभूमीमुळे हा संपूर्ण परिसर पावन क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असून,ह्या ठिकाणी सिद्ध गुरु रामनाथ महाराज आणि सिद्ध गुरु मोहननाथ महाराजांची समाधी,जगत्जननी श्री.जोगेश्वरी मातेचा आणि प्रत्यक्ष पालनहारी श्रीअन्नपूर्णा मातेचा निवास आहे.हे पवित्र ठिकाण पृथ्वीवरील स्वर्ग किंवा नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.त्यामुळे येथे केलेल्या,सर्व प्रकारच्या तप,जप,यज्ञ,पूजा,विधी या ठिकाणी केल्याने पुण्य मिळत असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे पुण्यकर्मे करण्यासाठी शिष्यमंडळी आणि भाविकांकडून या स्थानाची निवड केल्या जाते.या ठिकाणाची विशेषत: म्हणजे आजही येथे वेगवेगळी जंगली पशू,पक्षी आणि शेकडो जडीबुटी वनस्पती औषधी झाडे,बेलवृक्ष,वेली आहेत.अशा या ठिकाणी आज रोजी मठाधिश म्हणून सिद्ध गुरु अभेदनाथ महाराज गुरु सेवानाथ महाराज हे सेवारत आहेत.अशा ह्या रामापूर योगी मठात गुरुपरंपरेप्रमाणे झालेल्या,प.पू. सिद्ध गुरु सेवानाथ महाराज गुरु मोहननाथ महाराज यांची बारावी पुण्यतिथी सोमवार,दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न करण्यात आली असून त्यानिमित्त सिद्ध गुरु अभेदनाथ गुरु सेवानाथ महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व उपस्थितीत यशवंत पवार गुरुजी जिल्हाप्रमुख शिवसेना व शिष्य मंडळीच्या शुभ हस्ते प.पू.
.सिद्ध गुरु सेवानाथ महाराज यांच्या समाधीचे,पादुकांचे महाभिषेक करून शंखढाल पूजन व महाआरती करण्यात आली. व त्यानंतर भव्य अशा महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडला. दुपारी कालिंदाताई पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यवतमाळ यांच्या नेतृत्वात महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला.रामगाव रामेश्वर सह पंचक्रोशीतील वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील भाविक सद्भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी महाराजांचे शिष्य मंडळी नागनाथ महाराज गुरु अभेदनाथ ; मार्तंडनाथ गुरु अभेदनाथ उपस्थित होते. अशी माहिती मठाचे परम भक्त तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी दिली आहे.