जनसेवा हिच ईश्वर सेवा हेच याच प्रमाणे येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था ही आज पर्यंत सेवाभावाची जान ठेऊन बहुतेक सभासदाना अंत्यविधी मदत शत्रकिया साठी मदत रक्तदान शिबीर घेऊन रक्तासाठी मदत करीत असताना बहुतेक सभासदाची अत्यंत गरीब परस्थिती असल्यामुळे तसेच गावागावात जंगलातील वाघाची दहशत असल्यामुळे सभासदांच्या अंत्यविधी साठी जंगलातील लाकुड मिळणे दिवसेंदिवस कठीण झाले असल्यामुळे
सभासदांनी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या कडे सभासदांच्या अंत्यविधी साठी लाकुड उपलब्ध करून देण्याची समस्या सांगितली होती यावर श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम उपाध्यक्ष शेषराव कुमरे यांनी सांगितले की सभासदांचा संस्था पुढे जाण्यास सिंहाचा वाटा असल्यामुळे सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने त्याच्या सुख दुःखात सहभागी होणे सस्थेचा प्रथम कर्तव्य समजून सभासदांच्या अंत्यविधी साठी एक बिट लाकुड उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी सभासदांना दिले.