वाशिम : अमरावती विभागाचे विधानपरिषदचे लोकप्रिय आमदार एड किरणराव सरनाईक यांनी आपले १९८० ते १९९० च्या दशकातील जुने सहकारी कार्यकर्ते प्रदिप वानखडे यांच्या वडीलांचे स्व . विनायकराव वानखडे गुरुजी यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे घरी जावून कुटूंबियांचे सांत्वन केले . तर ज्येष्ठ लोककलावंत पत्रकार संजय कडोळे यांच्या प्रकृती स्वास्थाच्या चौकशी करीता संजय कडोळे यांच्या घरी, जुन्या सहकारी महिला कार्यकर्त्या सौ आशाताई गाडगे माळीपूरा यांच्या घरी तसेच विलास राठोड सर यांच्या घरी कौटूंबिक जिव्हाळ्याची धावती भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत के बी देशमुख गुरुजी हे होते . एड किरणराव सरनाईक यांनी यावेळी संजय कडोळे, प्रदिप वानखडे , सौ आशाताई गाडगे व कृष्णराव गाडगे गुरुजी सोबत दिलखुलास चर्चा करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला .यावेळी आमदार म्हणून व्हिआयपी प्रमाणे न वागता मैत्रीच्या भावनेने त्यांच्या गप्पांना रंगत आली होती.