कारंजा : स्थानिक विदर्भ कॉलनी येथील कु. सादिया फिरदोस मो. उमर चौधरी हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-2025) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून पहिल्याच फेरीत नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.
सादिया फिरदोस गवळी समाजाशी संबंधित असून त्या पोस्ट मास्टर मो. उमर चौधरी यांच्या सुपुत्री आहेत. त्यांनी आपले हायस्कूलपर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून पूर्ण केले. त्यानंतर बारावीची परीक्षा कारंजा येथील विद्याभारती ज्युनियर कॉलेज मधून उत्तीर्ण केली. पुढील तयारीसाठी त्यांनी अमरावती येथे नीटची विशेष क्लासेस मध्ये प्रवेश घेऊन परिश्रम व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले.
त्यांच्या या यशामुळे कुटुंब, नातेवाईक आणि समाजात आनंदाचे वातावरण आहे. सादिया भविष्यात स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) बनून समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, शिक्षक तसेच या प्रवासात साथ देणाऱ्या नातेवाईक व शुभचिंतकांना दिले आहे.
सादियाने हे सिद्ध करून दाखवले की, जीवनात ध्येय स्पष्ट असेल आणि मेहनत व चिकाटीने प्रयत्न केले, तर कोणतेही स्वप्न साकार करता येते.