बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीत दोन नाबालिकावर वेगवेगळ्या घटनेत अत्याचार झाल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. पहिल्या घटनेत राजुरा तालुक्यातील केळझर येथील आपल्या नातेवाईकाच्या घरून गावाकडे परत येत असताना बामणी फाट्यावर गावाकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत वाट पाहत मुलगी होती. तिरुपती पोलादवार व मोरेश्वर जम्पलवार हे दोघे दुचाकी वाहनावर येऊन गावाला चालण्याचा आग्रह करू लागले, त्यांच्या आग्रहामुळे मुलगी बसून गाडीवर बसण्यास तयार झाली. अल्पवयीन मुलीस कळवण्याचा जंगलात नेऊन आळीपाळीने जबरदस्तीने अत्याचार केला. त्या अल्पवयीन मुलीने आपली कशीबशी सुटका करून आपल्या घरी हकीगत सांगितलं व पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार देताच बल्लारपूर पोलिसांनी त्वरित हालचाल करून एका आरोपीस अटक केली तर दुसरा आरोपी फरार हालचाल करून एका आरोपीस अटक केली तर दुसरा आरोपी फरार आहे. आरोपीवर विविध कलमान्वये पुन्हा दाखल करून एका आरोपीस बेड्या ठोकण्यात आला आहे तर दुसरा आरोपी फरार आहे. सदर तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजूरकर मॅडम करीत आहे.
रवींद्र नगर येथे घडली काल नऊ जुलै रोजी सकाळी सव्वा सातच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर मॉर्निंग वाक करीत असताना प्रवीण मेश्राम याने तिला जबरदस्ती गाडीवर बसवून एफ डी सीएम चा पडीत जुन्या बिल्डिंगमध्ये घेऊन गेला व अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र पीडित अल्पवयीन मुलगी त्याच्या तावडीतून कशीबशी सुटून आरडाओरट करायला लागली. लोकांनी त्या मुलीची सुटका करीत घरी आणून सोडले मुलीने घरी आप बीती सांगितल्यावर बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे भादवि 354 अ, 354, ब, 363, 341, 507 यानुसारगुन्हा दाखल केला आहे. बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तात्काळ कारवाई करीत आरोपी अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजूरकर मॅडम करीत आहे.
या दोन्ही घटनेमुळे बल्लारपूर शहर हादरला असून पालकात चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे.