कारंजा (लाड) : जिल्ह्यातील एकमेव असलेल्या, कारंजा येथून दहा किलोमिटर अंतरावरील, शेलू बाजार औरंगाबाद हायवेवरील ग्राम तपोवन येथील, श्री सरस्वती देवी संस्थान तपोवन कारंजा येथे शारदिय नवरात्रोत्सवा निमित्ताने, श्रीमद् देवी भागवत सप्ताहाचा समारोप,शनिवार दि ०४ ऑक्टोबर रोजी पार पडला. यावेळी संस्थानचे संस्थापक संत पांडूरंग महाराज किर्तने यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.सर्वप्रथम श्री. सरस्वती देवीची महाआरती व महाप्रसाद संपन्न झाला असता अकोला, यवतमाळ,वाशीमसह कारंजा पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळ वाशीम जिल्ह्याचे आजिवन प्रचारक श्रीकृष्ण पाटील नेमाने कारंजा, हभप. लक्ष्मण महाराज इंगळे मंगरूळपिर, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा प्रवचनकार हभप संजय म. कडोळे कारंजा, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कचरूजी आटपाटकर दस्तापूर, हभप मधुकर महाराज खोडे व्यसनमुक्ती सम्राट यांचे शिष्य विनोद महाराज खडसे, श्री आसरा माता भजनी मंडळाचे शेषराव पाटील इंगोले, विदर्भ लोककलावंत संघटनेचे प्रदिपजी वानखडे,गजाननराव चव्हाण, जगदगुरु माऊली सरकार कौंडण्यपुरचे शिष्य रामदासजी कांबळे,आई कामाक्षा मित्र मंडळाचे कैलास हांडे, गजाननराव खैरकार आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी समारोपप्रसंगी सर्व भाविकांतर्फे हभप.संजय महाराज कडोळे यांनी संत पांडूरंग महाराज किर्तने यांचे पूजन,हारार्पण व सत्कार केला. उपस्थितांचे एकमेकांनी हारार्पण केले.तर श्री सरस्वती देवी मंदिर कडून हभप. लक्ष्मण महाराज इंगळे यांनी प्रवचनकार संजय कडोळे यांचे शाल,श्रीफळ,हार देवून स्वागत केले.या कार्यक्रमाचे आयोजन हमप.ज्ञानेश्वर महाराज आणि सर्वच भाविक भक्त परिवारांकडून करण्यात आले होते.असे वृत्त पत्रकार गजानन चव्हाण यांनी कळवीले.