वाशिम/कारंजा:- पंधरा दिवसांपूर्वी कारंजाच्या सा. करंजमहात्म्य परिवाराचे मुख्य कार्यवाह तथा महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मिळालेल्या विश्वसनिय माहितीवरून,पुसदचे आमदार इंद्रनिल मनोहर नाईक यांचा लवकरच महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात प्रवेश होणार असल्याच्या बातम्या प्रकाशीत करून लवकरच वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ आमदार इंद्रनिल मनोहर नाईक यांच्या गळ्यात पडणार असल्याचे भाकित करून एकच खळबळ उडून दिली होती. आज रोजी त्यांचा अंदाज अखेर अचूक ठरलेला असून,नागपूर येथील दिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी दि.15 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात,राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या निवडक आमदारांमधून,गोर बंजारा समाजाचे भूषण आणि लोकप्रिय नाईक घराण्याचे वंशज पुसदचे तरुण,तडफदार आमदार इंद्रनिल मनोहर नाईक यांनी राज्यमंत्री म्हणून निवड करून त्यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली आहे.त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याचे वृत्त कळताच कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा,साप्ताहिक करंजमहात्म्य,कारंजा तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती संघ कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी जगदंबा देवीने आपलं साकडं ऐकल्याच्या आनंदात, जगदंबेचे पूजन व दर्शन करीत पेढे वाटून आपला नवस फेडून आनंद व्यक्त केला आहे.तसेच यावेळी हमखासपणे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.आ.इंद्रनिल मनोहर नाईक यांचे अभिनंदन करीत त्यांनी आशा व्यक्त केली की, राज्यमंत्री ना.इंद्रनिल नाईक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिष्ठित व नावलौकिक प्राप्त नाईक घराण्याचे वंशज असल्यामुळे निश्चितपणे त्यांच्या कारकिर्दीत,परमपूज्य सेवालाल महाराजांची पवित्र पुण्यभूमी आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या वाशिम जिल्ह्याचा सर्वोतोपरी विकास होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शिवाय कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,उमेश अनासाने,प्रदिप वानखडे, लोमेश पाटील चौधरी,लक्ष्मणराव इंगळे,अजाब महाराज ढळे,कांताबाई लोखंडे,इंदिराबाई मात्रे, देवकाबाई इंगोले आदींनी राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक यांना मंत्रीमंडळ समावेशा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आता लवकरच मुख्यमत्री देवेन्द्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाकरीता त्यांच्या नावाची घोषणा करतील आणि त्यांच्या कारकिर्दीत शेती सिंचन,उद्योगधंदे रोजगाराच्या बाबतीत आर्थिक दृष्टया उपेक्षित राहिलेल्या वाशिम जिल्ह्याचा संपूर्ण विकास होणार आहे तसेच नवनिर्वाचित आ.इंद्रनिल नाईक हे राज्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण वाशिम जिल्हयातच आनंद व उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या स्वागतासाठी वाशिम जिल्हावासी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.