तालुक्याच्या ठिकाण पासून रेतिघाट ४किलोमीटर अंतरावर आणि चार गावांची गटग्रामपंचायत कासवी या ठिकाणी रामपूर रेती घाट संबंधी माहिती अधिकार अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायत येथे जा.क्र.365 दि.26/10/2021 या क्रमांकाचा नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध नाही हे सिद्ध झाले आहे.
संबंधित नाहरकत प्रमाणपत्र देत असतांना कुठेतरी पाणी मुरलेला आहे हे सिद्ध होते.ग्रामपंचायत कासवी वार्ड क्र.3 अंतर्गत रेती घाट अर्जदारानुसार घाट क्र.10 सर्व्हे क्र.178/1,179 या घाटाचा लिलाव झाला.त्याकरिता रेती साठवणूक करण्यासाठी ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्राची पूर्तता करणे बंधनकारक आहे.अर्जदाराने प्रमाणपत्रसाठी अर्ज दि.25/10/2021 ला कार्यालयात सादर केला आणि ग्रामपंचायतने नाहरकत प्रमाणपत्र जावक रजिस्टर नुसार दि26/10/2021 ला निर्गमित केलेला आहे याचा अर्थ असा होतो की ग्रामपंचायत ने कुणालाही न विचारता तसेच दि.28/10/2021ला सभा असतांनाही वरील विषय सभेत न घेता परस्पर दिलेला आहे यात कुठेतरी पाणी मुरत आहे असे दिसून येत आहे .
वरील नाहरकत प्रमाणपत्र निर्गमित करीत असताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतिकडून ना हरकत प्रमाणपत्र हा सचिवांच्या सहीने द्यावा व मासिक सभेत घेण्यात यावा. मात्र वरील प्रमाणपत्र कुणाच्या सहीने गेला याबद्दल सचिव व सरपंच यांना विचारले असता त्यांनी सांगितले की वरील प्रमानपत्राबद्दल काहीही माहिती नाही असे मत मांडले आहे.
जर ग्रामपंचायत कासवी येथील अधिकाऱ्याने नाहरकत प्रमाणपत्र दिला नाही तर दिला कुणी,एखाद्या पदाधिकारीने हा कार्य रेतीवाल्याच्या बाजूने संपन्न केला असे निदर्शनात येत आहे.