भारत सरकार निवडणूक आयोग अंतर्गत येथील तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी येथे दि.06/11/2023 ला दोन दिवसीय विशेष मोहीम मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला.
वरील शिबिरात नायब तहसीलदार वाकूलकर यांनी फार्म भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मतदार यादीत नादुरुस्त आलेले नाव दुरुस्त करणे, मय्यत व्यक्तीचे नाव वगळणे, बन्मतारखेत नाव दुरुस्त करणे, छायाचित्र दुरुस्त करणे, (नमुना ८ व ८अ, नमुना ६ व ७ ) इत्यादी याबबद्दलची माहिती दिली
उच्च माध्यमिक विद्यालयाचे 15 विद्यार्थ्यांनी नवमतदार म्हणून नोंदणी केली
या शिबिराला शिबीर अध्यक्ष विद्यालयचे पर्यवेक्षक श्री बहेकर, प्रमुख उपस्थिती श्री वाकूलकर नायब तहसीलदार तथा नोडल अधिकारी आरमोरी, प्रा.कु. शेंडे, प्रा. मेश्राम उपस्थित होते.
वरील कार्यक्रमाचे संचालन प्रा. राखाडे, आभार प्रा. सेलोकर यांनी केले तर शिबिरात विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते