चंद्रपूर – देशात शेवटची जातनिहाय जनगणना वर्ष 1931 ला झाली होती, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा जातनिहाय जनगणना झाली नाही, वर्ष 1931 ला ओबीसींची आकडेवारी 54 टक्के होती.
देशातील विविध भागात ओबीसी बांधव जातनिहाय जनगणना साठी जनजागृती करीत शासनाला निवेदन देत आहे.
आज देशात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जातनिहाय जनगणनेबाबत आगळावेगळा उपक्रम राबविला.
जनजागृती करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर तालुक्यातील वेंडली व पिपरी धानोरा भागात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पाडल्यावर ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी यासाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची चर्चा आज संपूर्ण गावात सुरू होती, या उपक्रमात गणेश आवारी, पारस पिपालकर, चंदू माथने, रंगराव पवार, दीपक पिंपलशेंडे, सुमित देवाळकर, विशाल धाबेकर, राहुल चालूरकर, सूरज देवाळकर, वैभव क्षीरसागर, श्रीकृष्ण देवाळकर, संजय देवाळकर व शुभम दुरूटकर यांची उपस्थिती होती.