चंद्रपूर : जिल्ह्यात सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी तालुक्यात आता पर्यंत एक पन्नास किलो वजनाची रिंग तर पाच व्हॉलीबालच्या आकाराचे सिलेंडर आढळून आल्यानंर अवकाशातून पडलेल्या सँटेलाईट रॉकेटचे तुकडे आढळून येणे अद्याप थांबलेले नाही. एक रिंग आणि पाच सिलेंडर जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असताना पुन्हा चिमूर तालुक्यात एक गोलाकर रिंग आणि एक सिलेंडर आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सहा गोल सिलेंडर आणि दोन रिंग अवकाशीय वस्तू आढळूनआल्या आहेत. सगळ्याच वस्तू ह्या प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत.
शनिवारी (2 एप्रिल) च्या रात्री आठच्या सुमारास अवकाशातून आगीचे गोळे जमिनीवर कोसळताना आढळूनर आले. राज्यातील अनेक जिल्ह्यात ह्या अवकाशीय वस्तुचे दर्शनही नागरिकांना घेता आले. चंदपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील एका छोट्याशा खेडे गावात लाडबोरी येथे सर्वप्रथम गोलाकार जड रिंग आढळून आली होती. तर पवनपार येथे व्हॉलीबाल आकाराचा सिलेंडर आढळून आला होता. त्यांनतर त्याच तालुक्यात आसोलामेंढा तलाव परिसर, मऱ्हेगाव व गुंजेवाही शेजारी तीन सिलेंडर आढळून आलेत. ही घटना ताजी असतानाच जिल्हयातील दुसरा तालुका ब्रम्हपुरी येथे एकारा बोदरा शेतशिवारात शेळ्या चारायला गेलेल्या एका गुराख्याला गोलाकार सिलेंडर आढळून आला. सिंदेवाही तालुक्यात एक रिंग आणि चार सिलेंडर तर ब्रम्हपुरी तालुक्यात एक सिलेंडर असे एक रिंग आणि पाच सिलेंडर मिळाल्यानंतर काल बुधवारी (6 एप्रिल) ला तिसरा तालुका चिमूर येथे एक रिंग आणि एक सिलेंडर आढळून आली आहे.
चिमूर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्राअंतर्गत तळोधी बीटातील कक्ष क्रमांक 45 मधील वनतलावाजवळ वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, आपल्या सहकार्यासह नियमित गस्त घालीत होते. त्यांना तलावात विचित्र अशी वस्तू दिसल्याने त्याला बाहेर काढले असता, जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या सॅटलाईट राँकेटचे अवशेष असल्याचे समजले. त्यांनी माहिती चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगळे यांना दिली. त्यांनी अवकाशीय अवशेष आपल्या ताब्यात घेतले. सध्या स्थितीत हा अवशेष चिमूर पोलीस स्टेशन इमारतीमध्ये ठेवण्यात आला असून अंतराळ विभागातील तज्ञ आल्यानंतर त्यांचेकडे हा अवशेष सोपविण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर दुसरा अवशेष खडसंगी जवळील वाहनगाव येथे काही नागरिक शेतावर जात असतांना, त्यांना पांदण रस्त्यावर एक रिंग व काही अवशेष आढळून आले. लगेच त्यांनी, वाहनगावचे सरपंच प्रशांत कोल्हे यांना माहिती दिली. त्यांनी ती अवकाशीय वस्तू ताब्यात घेऊनर पोलिस प्रशासनाच्या स्वाधीन केले आहे.
जिल्हयात आतापर्यंत सहा गोलाकार सिलेंडर तर दोन रिंगा आढळून आल्या आहेत. पुन्हा त्या अवकाशीय सँटेलाईट राँकेटचे अवशेष आढळून येण्याची शक्यता खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविली आहे. जिल्हाधिकारी यांनी इतरत्र अवकाआढळून येणाऱ्या अवकाशीय वस्तु प्रशासनाच्या स्वाधीन करावे असे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक अवकाशीय वस्तू आढळून आल्यानंतर प्रशासनाला माहिती देवून वस्तू ताब्यात देत आहेत.