(वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) मानोरा : वाशिम जिल्ह्याच्या मानोरा शहरात स्थानिक रहदारीच्या शिवाजी चौक मानोरा येथे दि 26/5/2023 रोजी दिवसा ढवळ्या सकाळी अंदाज 10 : 30 ते 12:00 वाजताच्या दरम्यान मानोरा येथे भरदिवसा ग्रामीण भागातील दोन तरुणांवर अज्ञात युवकानी तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. व मोटार सायकल वरून पसार झाल्याचे कळते.जखमी झालेल्या दोन युवकांना मानोरा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता एकाचा जागीच मुत्यु तर दुसऱ्या युवकाला उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले मात्र त्याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.वादाचे कारण समजू शकले नाही. मानोरा येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 11.30 ते12वाजेच्या दरम्यान दोन युवका वर अनोळखी मोटर सायकल स्वार व्यक्तींनी केलेल्या चाकूने किंवा धारदार शस्त्राने जखमी झाल्याची माहिती मानोरा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मानोरा पोलिस स्टेशनचे स्टेशन पो. नी.महेश कुचेकर, पोलिस उपनिरीक्षक सविता वड्डे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचून जखमी तरुणांना शासकीय रुग्णालयात दाखल केले .डॉ नांदे यांनी एका युवकाला मूर्त घोषित केले व दूसऱ्याला पुढील उपचाराकरिता अकोला येथे रेफर केले शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्यामुळे पोलिसांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात अडचणींचा सामना करावा लागला.
या घटनेत शिवा विलास उघडे वय 22 वर्ष ( रा.बेलोरा) जागीच मृत्यु पावला. तर राहुल चव्हाण वय 26 (रा. भुली)उपचारा दरम्यान.असी माहिती मिळाली आहे.पुढील तपास मानोरा येथील संबंधित पोलीस स्टेशन करत आहे.