कारंजा : वकिलांच्या हितांना प्रोत्साहन देण्यासाठी,व्यावसायिक मानके आणि नीतिमत्ता नियंत्रित करणे, वकील नियमांचे पालन करतात आणि व्यावसायिकपणे वागतात याची खात्री करणे, कायदेशीर व्यवस्था सुधारणांचे समर्थन करणे व सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन सामाजिक कार्यात सहभागी होऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याच्या हेतूने बार असोसिएशनची निर्मिती झाली आहे.
त्याच धर्तीवर कार्य करण्याच्या हेतूने कारंजा (लाड) न्यायपालिका कार्यक्षेत्राकरीता कारंजा बार असोसिएशनच्या कार्यकारिणीचे नूतनीकरण करण्यात येऊन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
नवीन गठीत झालेल्या कारंजा बार असोसिएशनच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी ॲड.अविनाश वैद्य साहेब, उपाध्यक्षपदी ॲड. नितल रामटेके मॅडम,सचिवपदी ॲड. राहुल मनवर साहेब,कोषाध्यक्षपदी ॲड. धम्मानंद देवळे साहेब यांची सर्वानुमते निवड करून नियुक्ती करण्यात आली. कारंजा न्यायपालिकेच्या क्षेत्रातील सर्व वकील मंडळींनी कार्यकारिणीच्या सन्माननीय सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कारंजा बार असोसिएशनची कार्यकारणी गठीत झाल्याचे वृत्त ॲड. सुभान खेतीवाले यांनी देऊन नविन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या.