कारंजा (लाड) : ३५- कारंजा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी रोजी होत असल्याने
झाशी राणी चौक ते कृषीउत्पन्न बाजार समिती कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ शकते.झाशी राणी चौक ते मंगरुळपीर रोड,रिलायंस पेट्रोलपंप, रामायण चौक ते कारंजा शहर व कृषीउत्पन्न बाजार समिती कारंजा कडे जाणारा रोड दि.२३ नोव्हेंबर सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रहदारीस बंद राहणार आहे.या मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गावर वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी निर्गमीत केले आहे.