कारंजा : दारुच्या व्यसनाधिन झालेल्या मुलाकडून,स्वतःचे वडिल,पत्नी व मुलाबाळावर होत असलेल्या अत्याचाराचा व मारहाणीचा अतिरेक होऊन अखेर दि. 31 ऑक्टोंबरच्या रात्री 70 वर्षीय वयोवृद्ध वडीलांकडूनच, 45 वर्षाय व्यसनाधिन मुलाचा खून होण्याची दुदैवी घटना कारंजा तालुक्यातील,धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या, मसला या गावखेड्या मध्ये घडली आहे. याबाबत मिळालेले वृत्त असे की, मसला येथे वास्तव्यास असलेला शरद सोनवने ट्रॅक्टर ड्रायव्हर असतांनाही कोणताच कामधंदा न करता वडिलांच्या भरवशावर जगत असतांना, दारूच्या व्यसनापायी वडील व त्याचे पत्नीला त्रास देत असल्याने व दारू करीता वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने शरद सोनवणे याच्या जाचाला कंटाळून पत्नी मुलामुलीला घेऊन 15 दिवसापूर्वी माहेरी निघून गेली होती.त्यामुळे शरद सोनवणे वडिलांशी सुद्धा सतत भानगडी करून मारहाण करीत होता. दि 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8:00 वाजता त्याने वडिलाना मारहाण करीत दुखापत केली.त्यामुळे चिडलेल्या वडिलांनी रात्री शरद गाढ झोपेत असताना लोखंडी सब्बलने त्याच्या डोक्यावर वार केले त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला. या घटनेबद्दल,धनज पोलिसांनी वयोवृद्ध वडील आकाराम सोनोने यांना अटक करून गुन्हा नोंदविला असून अधिक चौकशी सुरु आहे.