कारंजा (लाड) : भक्तांनो,तुम्ही गेली दहा दिवस माझी मनोभावे पूजा अर्चना केली.मला खूप सुख,समाधान,आनंद दिला.फार बरं वाटलं.आज तुमचा निरोप घेण्याची वेळ आली.तुम्हाला एकच सांगण. "सर्वांशी प्रेमाने,एकोप्याने रहा.एकमेकांवर विश्वास ठेवा.इमाने इतबारे प्रामाणिक जीवन जगा.यापुढे मी स्त्री (नारी) रुपात सदैव तुमच्या सोबत राहील.कुणाची आई,बहिण,कन्या होऊन त्यामुळे मला ओळखा.यापुढे प्रत्येक स्त्री मध्ये माझे अस्तित्व जाणून,प्रत्येक स्त्रीचा,महिलामंडळीचा सदैव सन्मान ठेवा.आनंदी उत्साही जीवन जगा.तुमचे जीवन मी आनंददायी करेल. तन मन धनाने मी तुम्हाला आशिर्वाद देईन." तुमचीच कुलस्वामिनी : आदिशक्ती अंबाबाई. असा संदेश जगन्माता आदिशक्ती नवदुर्गा मातेने भक्तांकरीता दिला असल्याचे जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांनी कळवीले आहे.