कारंजा : कारंजा येथे झाडीपट्टी रंगभूमिच्या "गद्दार"नाट्याच्या प्रयोगासाठी कारंजा शहरात आलेल्या, सुप्रसिद्ध नाट्यकलावंत तथा अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नटसम्राट नरेश गडेकर यांची ईरो फिल्मस् एन्टरटेन्टमेन्टचे संचालक आणि जय हो स्वच्छ भारत अभियान या राज्यस्तरिय शासन पुरस्काराने सन्मानित लघुचित्रपटाचे निर्माते रोमिल लाठीया,डॉ.इम्तियाज लुलानिया तसेच आदर्श जय भारत बहु उ. संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गरड यांनी पुष्पगुच्छ देवून सहर्ष स्वागत केले.यावेळी त्यांनी नरेश गडेकर व कलावंताशी संवाद साधून आपल्या लवकरच प्रदर्शीत होणाऱ्या कलाकृती (लघुपटा)ची त्यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शन घेतले.