तेल्हारा -
शिवराज जामोदे म्हणजे माणसातली माणसं ओळखून त्यांना प्रेमाने जोडणारा मानवतावादी माणूस, दोस्तीच्या दुनियेतला दिलदार राजा. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कवितांनी व आगळ्या वेगळ्या वेशभूषणांनी गाजविणारा कविराज, महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्र गाजविणारा आदर्श शिक्षक.असे उद्गार लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी शिवराजे जामोदे यांच्या निरोप समारंभात आडसूळ येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयांमध्ये काढले. दिनांक २८ फेब्रूवारी रोजी झालेल्या या सेवापूर्ती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार विमाशीचे वसंतराव खोटरे हे होते. याप्रसंगी शिवराजे जामोदे सर व त्यांच्या धर्मपत्नी हेमा यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून सुचिता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला, शांतारामजी बुटे संत साहित्य अभ्यासक, प्रसिद्ध कवी, निवेदक, चित्रपट अभिनेते, गीतकार किशोर बळी ,लेखक डॉ प्रा .मोहन खडसे ,प्रसिद्ध कवी अशोक शिरसाट, मुंबई दूरदर्शन प्रतिनिधी विशाल राजे बोरे ,साहित्यिक राजू चिमणकर, तर मुख्याध्यापक अरविंद गिरे, सौ सुनीता बकाल मुख्याध्यापिका, श्रीमती दुर्गाताई जामोदे, सौ विमलताई जामोदे, श्रीकृष्ण जामोदे, जितेंद्र सोनटक्के, चंद्रभान झापर्डे रवींद्र वर्ग अरुण काळे, सौ सुनीताताई
काळे ,गोपाळराव जामोदे ,कवी संदीप देशमुख ,रवींद्र भास्कर सुनीता बकाल, मॅडम सौ हे हेमा शिवराजे जामोदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे शिवराजे जामोदे हे महाराष्ट्राचे प्रतिभावंत कवी आहेत. त्यांनी शिक्षकी जीवनामध्ये प्रतिभा संपन्न विद्यार्थी घडविले.निवृत्तीनंतर त्यांच्या हातून उदंड साहित्य निर्मिती होवो अशा भावना प्रसिद्ध कवी किशोर बळी यांनी व्यक्त करून त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिवराजे जामोदे हे मराठी कवितेच्या प्रांतातील विक्रमवीर आहेत. मराठी रसिकांच्या काळजात त्यांनी अढळ स्थान मिळवले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन हे आदर्श आणि प्रेरक आहे. आता त्यांचा भविष्यकाळही उज्वल आहे अशा शब्दात संत साहित्याचे अभ्यासक डॉ शांताराम बुटे यांनी विविध संतांचे अभंग सादर करून त्यांचा कार्य कर्तृत्वाचा गौरव केला.
शिवराजे जामोदे कविराज यांच्या प्रेमामुळे, शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळे मी आज त्यांच्या कार्यक्रमाला आली आहे. त्यांच्या कार्याने त्यांनी हजारो माणसे जोडलीत. त्यांनी माझी एक प्रकट मुलाखत घेतली होती ती प्रचंड गाजली. असे उत्स्फूर्त उद्गार डॉ .सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी निवृत्ती समारंभात काढले.
मला शैक्षणिक जीवनामध्ये जे नेत्रदीपक यश मिळाले त्याचे सर्व श्रेय मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वृंद, विद्यार्थी ,विद्यार्थिनी गावकरी यांना जाते. असे उद्गार सत्कारमूर्ती शिवराजे जामोदे सर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. याप्रसंगी माझी शाळाच पंढरी व निरोप या दोन कविता सादर करून त्यांनी सर्वांना जिंकले.
जामोदे सरांनी निवृत्तीच्या दिवशी सुद्धा भारतीय संस्कृती दर्शन घडवणारी आकर्षक छायाचित्र प्रदर्शनी भरवून आदर्श इतिहास घडविला. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन डॉक्टर सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
निवृत्ती समारंभामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक, गावकरी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी ,आणि विविध शाळांच्या शिक्षकांनी त्यांचा भेटवस्तू तसेच शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मुख्याध्यापक अरविंद गिरे सर तसेच अरुण काळे सर यांनी शिवराजे जामोदे सरांना कवितांची भेट देऊन त्या कवितांचे जाहीर वाचन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद गिरे, गणेश मानमोडे सर, अमित गिरे सर, अक्षय दहे, सौ नीता अवचार मॅडम, कुमारी संस्कृती जामोदे मॅडम, पुरुषोत्तम इंगोले, गणेश नागडे, विठ्ठलराव महाले, नंदकिशोर महाले व वर्ग ८,९,१० च्या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्या सौ सुनीता गिरे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन अमित गिरे सर यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....