कला हेच जीवन मानून आपल्या हयातीत लोककलेद्वारे समाज प्रबोधन व मनोरंजन करून लोककलेद्वारे आपला उदरनिर्वाह करीत प्रपंच चालविणाऱ्या कलावंताना वृद्धापकाळी मानधन मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. सध्या विद्यमान जिल्हाधिकारी यांनी अधिकारी वर्गाचे अधिकारात जिल्हास्तरिय वृद्ध साहित्यिक कलाकार निवड समिती स्थापन केलेली असून, त्यांचेकडून दि 04 मार्च 2024 पासून सामाजिक न्याय भवन वाशिम येथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात कलावंताच्या मुलाखती व कलावंताचे सादरीकरण घेणे सुरू असून एखाद्या अधिकारी पदासाठी मुलाखात घेतल्या जावी व्यापद्धतीने वयोवृद्ध कलावंतावर प्रश्नाची सरबत्ती सुरु असल्याचे वृत्त असून कलावंतावर एक प्रकारे मानसिक दबाव टाकल्या जाण्याचा प्रकार घडत असल्याने बंद कॅबिनमध्ये कलेचे सादरीकरण घेतल्या जात असल्याने कलावंत गांगारून जात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी वर्गाने मनमानी न करता वयोवृद्ध व दुर्धर आजार ग्रस्त कलावंताचा सौजन्याने विचार करून,सरसकट सर्वच कलावंताना मानधन मंजूर करण्याची मागणी होत आहे.