महाराष्ट्र राज्यात दिनांक 13.03.2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी करण्यात येत होती. दिनांक 31.03.2022 चे शासन आदेशान्वये, महाराष्ट्र राज्यात कोविड-19 विषाणू साथरोग परिस्थिती नियंत्रण असल्याने सद्यस्थितीत सुरु असलेले कोविड-19 प्रतिबंधात्मक नियमावली शिथील करण्याचे निर्देश आहेत.
दिनांक 31.03.2022 चे शासन आदेशातील तरतुदीच्यां अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनतेस, व्यक्ती्, आस्थापना यांना उद्देशुन यापूर्वी लागू असलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भांत सर्व आदेश रद्द करणे आवश्यखक असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हानदंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा, यांनी दिनांक 31.03.2022 चे शासन निर्देशाप्रमाणे कोविड - 19 साथरोग संदर्भाने वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींसंदर्भात जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी व साथरोग संदर्भाने सर्व आदेश दिनांक 01 एप्रिल,2022 चे मध्यरात्रीपासून रद्द केले आहे. तथापि नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे आरोग्याचे दृष्टिकोनाने हितकारक असेल असे जिल्हाधिकारी व जिल्हाकदंडाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा, यांनी कळविले आहे.