शहरालगत भुतीनाला वाहतो. भुतीनाल्यालगत अनेक गावे आहेत. त्यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील तालुक्यातील उचली, कालेता, चांदली, कहाली, खंडाळा, कन्हाळगाव, बोंडेगाव, कुर्झा, नवेगाव, कोथुळणा, झिलबोडी, परसोडी, बोरगाव, उदापूर, पारडगाव, बेटाळा ही गावे आहेत. यामधील काही गावांतील पाणीपुरवठा योजनेच्या विहीरी याच भुतीनाल्यात आहेत. तर आजुबाजुच्या परिसरातील जनावरे सुध्दा याठीकाणी पाणी पिण्यासाठी येतात. परंतु सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच भुतीनाल्याचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती.
यासंदर्भात काही नागरिकांनी सदरची बाब राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवली. तेव्हा पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सदर बाब गांभीर्याने घेत गोसेखुर्दच्या संबंधित अधिकारी यांना यासंदर्भात भुतीनाल्यात गोसेखुर्दचे पाणी सोडण्याबाबत सुचना केल्या. त्यामुळे आता भुतीनाल्यात गोसेखुर्दचे पाणी सोडण्यात आले असुन परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त करीत पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.