वाशीम )
भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा कारभार ज्या संविधानाने चालतो त्या संविधानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करत आहे, सन 2000 पासून वाशीम जिल्ह्यात संविधान बांधीलकी महोत्सव तथा संविधान गौरव दिन साजरा करण्यासाठी पी. एस. खंदारे यांच्या प्रयत्नातून अविरतपणे चालू आहे, संविधान गौरव दिंडी, भारतीय संविधान प्रास्ताविकेचे शासकीय निमशासकीय कार्यालयात प्रती वर्ष वितरण करुन दर्शनी भागात लावण्यासाठी कार्यालय प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांना मोफत वितरण करण्यात आले,चालता बोलता संविधान प्रश्न मंजुषा, सरपंच व ग्रामसेवक यांना संविधान वाटप करुन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या,शाळा महाविद्यालयातून संविधानाची ओळख करून दिली, संविधान जनजागृती करण्यासाठी भारुड, अभंग, पोवाडे आदी च्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे,
याचाच एक भाग म्हणून सव्वीस नोव्हेंबर रोजी वाशीम शहरातील आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान गौरव रॅली काढण्यात येणार आहे, हि रॅली पाटणी चौक मार्गे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचण करून समारोप होईल या रॅलीत शहरातील कलावंत, लेखक, साहित्यिक यांनी सहभागी व्हावे व सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी पर्यंत वाशीम जिल्ह्यात विविध ठिकाणी रोडशो,कलापथक, व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती करुन संविधान गौरव करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सखाराम ढोबळे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विजय शिंदे पाटील, जिल्हा प्रधान सचिव महेश देवळे पाटील, वाशीम शाखा अध्यक्ष डॉ.रामकृष्ण कालापाड अशासकीय सदस्य जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती,वाशीम शाखा कार्याध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग वाशिम चे पी. एस.खंदारे, महिला विभाग कार्यवाह तथा अशासकीय सदस्य जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती वाशीम चे कुसुमताई सोनुने, शाहीर दतराव वानखेडे, प्रशिक्षण विभाग कार्यवाह नाजुकराव भोंडणे, विधी सल्लागार एड.सेवेंद्र सोनोने, जयश्री भडांगे,मुकनायक विचार मंचाचे अध्यक्ष राजु दारोकार, उपाध्यक्ष सुखदेव काजळे, कोषाध्यक्ष निलेश भोजणे,बाल कल्याण समिती चे विनोद पट्टेबहाद्दुर, बालाजी गंगावणे आदींनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....