अमरावती, ः महाराष्ट्र ट्रायबल अॅन्ड रुलर वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित स्थानिक चैतन्य कॉलनीतील कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात गणवेश व शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी वर्ग ११ चा प्रवेशोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विजय काटे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय घटकातील १०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व ११ वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मा.प्रा.बन्सीलाल प्रजापती, प्रा.गावंडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयाकडून दरवर्षीच अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमाला प्रा.घोंगडे मॅडम, प्रा. तृप्ती भुजाळे मॅडम, प्रा.अवस्थी मॅडम, प्रा.ढोके मॅडम, प्रा. खुरत मॅडम, प्रा.साठे सर, प्रा.कांबळे सर, प्रा.चोरे सर, प्रा.अवस्थी सर व शंकरभाऊ मानकर, नंदुभाऊ इंगोले, शंकरराव ढोके हे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती होते.