वरोरा :--चंद्रपूर - नागपूर महामार्गावर असणाऱ्या टेंमुर्डा या गावातील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत आज दिनांक 9 डिसेंबर ला चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने कोणतेही मोठे आर्थिक नुकसान या बँकेत झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला.
टेंमुर्डा येथील बँकेत रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूने सर्वप्रथम ग्रामपंचायत टेंभुर्डा येथील इमारतीला मोठे भोगदाड पाडीत त्यातून प्रवेश केला, त्यानंतर बँकेच्या आणि ग्रामपंचायत यांच्या मधोमध असलेल्या भिंतीला मोठे छिद्र करून आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु याची माहिती महामार्गावर पेट्रोलिंग करीत असलेले पोलीस कर्मचारी प्रवीण निकोडे तसेच दिनेश मेश्राम यांना त्याची माहिती मिळतात येन्सा या गावतून तीन मिनिटातच पोलीस कर्मचारी टेंभुर्डा या गावी पोहोचल्याने चोरट्यांनी बँकेमागे असलेल्या शेत शिवारातून पळ काढला. बँकेतील डीव्हीएम तसेच एक एलसीडी चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना होता होता थांबली.
दोन वर्षांपूर्वी या बँकेत काही चोरट्यांनी अशाच प्रकारे गॅस सिलेंडरच्या साह्याने गज कापून आत मध्ये प्रवेश मिळवला धाडसी दरोडा टाकला होता त्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले होते आता पुन्हा ही घटना घडल्याने बँकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हि जागा धोक्याची ठरत आहे.
बँके च्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीच्या मागील भागात शेत शिवार असून रात्रीला निर्मनुष्य असल्याने चोरटे याचा फायदा घे याचे शिवारातून मागील भागातून बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे सदर बँकेची जागा आता बदलविणे गरजेचे झाले असून पुन्हा याची पुनरावृत्ती होण्याची संभावना नाकारता येत नाही.