तालुक्यातील पिपंळगाव येथे विजय मारोती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारोती धवणे यांचे आज दिनांक 29 जाने. रोजी वयाच्या 75 व्या वर्षी वयोवृद्धपणाने निधन झाले.
मृतत्म्याचे सर्व सोपस्कार पार पाडून अनुसया धवणे यांचे प्रेत नेत असताना अचानक एक वानर साक्षात बजरंग बलीच्या रूपाने स्मशान भूमी पर्यंत पोहचल. वानराने प्रेत च्या जवळ जाऊन मृतकाच्या हातातील बांगड्या फोडल्या, डोक्यावरील पदर काढला एव्हढेच नव्हे तर मृताकाच्या शवाला मिठी मारून, डोळ्यावरील चष्मा बाहेर काढला. मृताच्या शरीराचे अंतीमसंस्कार होत पर्यंत सोबत होत. अस्थी गोळा करण्याकरिता सुद्धा घरी उपस्थित होते. 20 वर्षा पूर्वी मारोती धवणे यांच निधन झालं होत. वानर ने अनुसया यांच्या प्रेत ला भेटून मोक्ष प्राप्त झाला नसेल ना अशी गावात, नातेवाईक मधे चर्चा आहे. बजरंगबलिचा चमत्कार किंवा योगायोग सुद्धा असु शकतो अशी चर्चा गावात सर्वत्र सुरु आहे.