कारंजा (लाड)- महाराष्ट्रातील भटक्या नाथ जोगी समाजातील, भूमिहीन शेतमजूर तसेच दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या अंतर्गत शंभर टक्के अनुदान शेत जमीन मिळावी याकरिता वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांनी. नुकतेच कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिल्याचे वृत्त वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.या संदर्भात अधिक वृत्त असे की,निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,राज्यशासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना.ह्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील भूमिहिन शेतमजुराचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थीक योजना या योजनेत शासनाकडून भूमिहिन अनुसूचित जाती प्रवर्गातील दारिद्रयरेषेखालील भूमिहिन शेतमजुर कुटूंबाला चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन अनुदानावर मिळतेया करिता संबंधीत प्रवर्गातील भूमिहिन शेतमजुरांना जमीन खरेदी करण्यासाठी १००% अनुदान दिले जाते. परंतु कुठलाही परंपरागत व्यवसाय नसलेल्या भटक्या जमातीतील नाथजोगी समाजाकरिता आजतागायत शासनाने अशा प्रकारची कुठलीही योजना आणलेली नाही. पर्यायाने हा समाज विकासापासून कोसोदूर आहे. नाथजोगी समाजाकरिता वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने वेळोवेळी राज्यशासनाला निवेदने देण्यात आली. प्रसंगी आंदोलने सुध्दा केली परंतु आजही ठोस असे नाथ समाजाच्या पदरात काहीच पडले नाही.
आपले समाजाभिमुख सरकार असल्याचे निदर्शनास येत आहे. नाथ समाज हा नेहमीच उपेक्षीत जीने जगतो आहे. पाल मांडुन राहणे, भिक्षा मागुन जीवन कंठने ग्रामुळे सामाजिक आर्थिक विकास अजून तागायत झालेला नाही. त्यामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेसारखी नाथ समाजातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटूंबाला अनुदानावर शेत जमीन मिळण्यासाठी असाच प्रकारची सक्षम योजना लवकरात लवकर प्रभावीपणे राबवावी अशी मागणी समस्त भटक्या नाथजोगी समाजाच्या वतीने व वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांनी केली आहे.