दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी स्थानिक स्व.श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी येथे शाळेचे मुख्याध्यापक, श्रीमाननीय नितीनजी कासार सर यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचे शिक्षक श्रीमाननीय किरण मांडवकर ,रविकांत म्हस्के ,गुलनाज शेख यांचे प्रमुख उपस्थिती "हिंदी दिवस"अभियांत्रिक दिवस" त्याचप्रमाणे "स्व.श्रीमती.वत्सलाबाई वनमाळी यांची 19 वी पुण्यतिथी" कार्यक्रम साजरा करण्यात आला.
"हिंदी दिवस"या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्ग १०वी च्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ४ गट पाडण्यात आले प्रत्येक गटाला "द सर्कल", "विजेता", "थंड रस"व "द हिंदीयस" असे चार नाव देण्यात आले व त्या माध्यमातून आधिकाल, भक्तीकाल, रितिकाल व आधुनिक काल या काळांचा विशेष कवीवर चार्ट बनवणे आले.
वर्ग ९वी च्या विद्यार्थ्यांनी कुमारी काव्य ठवकर व मेदनी खोब्रागडे तथा वर्ग ७वी चे विद्यार्थीनी कुमारी देवांशी दिवटे आणि रुद्धी कुंभारे यांनी "अभियांत्रिक दिवस"या विषयावर भाषण केले.
त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक श्री. रविकांत म्हस्के सर त्याचप्रमाणे शाळेच्या शिक्षिका ज्ञानेश्वरी शेंडे यांनी "अभियांत्रिक दिवस" या विषयावर छान मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक नितीन कासार सर यांनी "स्व.श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी यांच्या पुण्यतिथी", "हिंदी दिवस" तथा "अभियांत्रिक दिवस"आधारित प्रमुख मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन मनीषा दडमल आणि सीमा मेश्राम यांनी केले आभार प्रदर्शन पपिता बुल्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.