शेतीपूरक व्यवसायाची निवड, प्रकल्पची निवड कशी करावी यासाठी हितकारिणी उच्च माध्य विद्यालयातील वर्ग 12 वा विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा रेशीम प्रकल्पची भेट घेतली.
विद्यार्थ्याना चार भीती बाहेरील शिक्षण मिळावे यासाठी हितकारिणी उच्च माध्य विद्यालयाचे प्राचार्य फुलझेले सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हा रेशीम प्रकल्प आरमोरी येथे भेट घेतली या क्षेत्र भेटीतर्गत जिल्हा रेशीम विकास अधिकारी वासनिक यांच्या पूर्वपरवानगीने प्रकल्पचे तंत्र अधिकारी उके यांनी रेशीम उद्योगाबाबत सविस्तर माहिती दिली त्यात रेशीमचे विविध प्रकार सांगून रेशीम उद्योग शेतीपूरक असून विद्यार्थ्यांना उद्योजक बनावे असे आमंत्रीत केले.
क्षेत्र भेटीसाठी प्रा. सहारे, प्रा. दोनाडकर, प्रा. प्रधान, प्रा. कु. मेश्राम हे उपस्थित होते.