सरस्वती नगर जुना वाशिम नाका बायपास रोड अकोला येथील खेंडकर ज्ञानगंगेत 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली उपस्थिती दर्शविली. शाळेतील भव्य प्रांगणात ध्वजारोहण करून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी हितगुज साधले. देशासाठी स्वतंत्र सैनिकांवर आधारित प्रश्नमंजुषा राबवून विद्यार्थ्यांना बक्षीस दिले व त्यांना पुढील आयुष्यासाठी प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर, स्व यमुनाबाई खेंडकर प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अल्केश खेंडकर यांची प्रार्थनीय उपस्थिती होती.
दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी देशांमध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध असे विविध धर्म असूनही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही प्रणित प्रमाणे "आपण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीयच आहोत" असा संदेश दिला. तसेच याप्रसंगी शाळेमध्ये येतांना शाळे समोरील मुख्य मार्ग हा व्यवस्थित नसून चिखल आणि नालीचे पाणी रस्त्यावर आलेले दिसल्यामुळे शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी या चिखलमय मार्गातून प्रवास करावा लागतो; ज्ञानदानाचे मंदिर हेच खरे मंदीर असून विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये सुद्धा भयंकर नरक यातना सहन कराव्या लागत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आणि पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये निश्चितच शाळेसमोरील मार्ग साठी भरघोस निधी लवकरच जाहीर करून रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवी उत्तेजना व आनंद बघावयास मिळाला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांना भारत माता की जय घोषणा देत चांगलाच प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन उषा जगदाळे यांनी केले. तर आभार प्रज्ञानंद थोरात यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या साठी शाळेतील शिक्षक आशा हिवरकर, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे, सुरेश सुरत्ने, कांचन वानखडे, मनीषा अंभोरे, प्रशांत काळे, अश्विनी सोळंके, पल्लवी हिंगणकर, शितल तिवारी, अंजु मुंढे, मिना घाटोळे, यामीनी उपश्याम, उन्हाळे मॅडम, शारदा पांडे, कांचन तायडे, जया तेलगोटे, संचीता भालतीलक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.