ब्रम्हपुरी गांगलवाडी मार्गावरील मौजा मालडोंगरी जवडील गराडी नाल्यावरील पूल कम बंधारा बांधकाम मे महिन्यात सुरू करण्यात आले व दरम्यान च्या काळासाठी वळण मार्ग तयार करण्यात आला परंतु पहिल्याच पावसात वळण मार्ग वाहून गेला .वाहतूक होत असलेला जुना पूल जमीनदोस्त करण्यात आला यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे व यामुळे विध्यार्थी ,शेतकरी, शेतमजूर व गावकरी यांना मोठा मनस्ताप होत आहे .विध्याथ्यांनी ब्रम्हपुरी येथ येणे जाणे करण्यासाठी गोसी खुर्द कॅनल ने यावे तर वाघाची भीती असून ब्रम्हपुरी आरमोरी महामार्ग येथून यावे तर मोठे अंतर पार करावे लागते. शेतकरी, शेतमजूर यांच्या रोवण्यासाठी ट्रॅक्टर ने आण करणे खर्चिक असून मजूर नेने त्रासदायक झाले आहे तसेच अनेक गावातील नागरिक यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतो. यामुळे विद्यार्थी, शेतकरी,शेतमजूर, व या भागातील नागरिक यांना होणारा त्रास लवकर दूर व्हावा व वळण मार्गाचे काम त्वरित सुरू करावे यासाठी भाजपचे वतीने माजी आमदार प्रा अतुल देशकर यांच्या नेतृत्वाखाली मा उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारीनी सदस्य प्रा प्रकाश बगमारे,माजी नगरसेवक तथा भाजपा नगर महामंत्री मनोज भूपाल,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष प्रेमलाल धोटे,ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा डॉ अशोक सालोडकर,युवा नेते सिद्धेश्वर भर्रे,प्रा दिवाकर पिलारे,ऍड रघुवीर बावनकुळे, प्रभुजी अवसरे,प्रा राजेंद्र भजे, माजी सरपंच तुळशीराम बगमारे,जयघोश सहारे,अरविंद चहांदे,योगी राऊत व अन्य उपस्थित होते यावेळी बांधकाम विभागाचे श्री चहांदे यांनी तात्काळ वळण मार्गाच्या कामाला सुरुवात करू असे सांगितले