कारंजा लाड:-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस ,धडाडी चे काँग्रेस नेते, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सतत आंदोलन करणारे तरुण तडफदार उच्च शिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून ख्याती असलेले देवानंदभाऊ पवार यांनी नुकतीच कारंजा लाड येथे सदिच्छा भेट दिली
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या नागपुरातील काँग्रेस च्या महारॅलीत कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून प्रदेश सरचिटणीस देवानंदभाऊ पवार व वाशिम जिल्हाध्यक्ष आमदार अमित भाऊ झनक यांच्या सूचनेनुसार तर प्रदेश सचिव व काँग्रेस चे सक्रीय तसेच निष्ठावंत नेते दिलीपभाऊ भोजराज यांच्या नेतृत्वात बहुसंख्य कार्यकर्त महारॅलीत सहभागी झाले होते त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवानंदभाऊ पवार आवर्जुन उपस्थित राहीले
यावेळी शहर, तालुका , सेवादल, एन एस यु आय, व्हिजेएनटी ,पंचायत राज विभाग व युवक काँग्रेस च्या वतीने देवानंदभाऊ पवार यांनाही नववर्षानिमित्त व भावी वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी प्रदेश सचिव दिलीपभाऊ भोजराज , अमीर खान पठाण, राज चौधरी, ॲड संदेश जैन जिंतुरकर, युसूफ भाई जट्टावाले, अक्षय बनसोड, ॲड वैभव ढगे, विठ्ठलराव अवताडे ,ॲड वैभव लाहोटी, अरुण चव्हाण, नुरमहम्मद सोनु, तौसिफ खान, महम्मद अफसर , फैजल खांन पठाण उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....